Wednesday, June 25, 2014

वेगळ्या वाटेवरच्या प्रवासाचा 'आरंभ'


आरंभ फाउंडेशन, सांगली आयोजित
वेगळ्या वाटेवरच्या प्रवासाचा 'आरंभ'
चाकोरीच्या वाटा सोडून वेगळा मार्ग निर्माण करणारी माणसं समाजापुढं आणणारा कार्यक्रम
 
वक्ते -
 
१. श्री. चेतन रायकर
व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर असलेल्या चेतन रायकर यांची कंपनी वास्तुनिर्माणासोबतच पुरातन वास्तुंची देखभाल (हेरिटेज कन्झर्व्हेशन) या वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर उद्ध्वस्त झालेले मुंबईतील ताज हॉटेल पुन्हा जसेच्या तसे साकारण्याची किमया रायकरांनी करुन दाखवली आहे. शेकडो वर्षे नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांना तोंड देणा-या महाल, राजवाडे, व पुरातन वास्तूंची पुनर्बांधणी व देखभाल करणे हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. स्वतः रायकर हे हेरिटेज कन्झर्व्हेशनचे गाढे अभ्यासक असून पुरातन वास्तुकलेची वैशिष्ट्ये व त्यांच्या देखभालीची गरज यावर ते मल्टीमीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
 
२. श्री. मकरंद व सौ. अंजली चुरी
परदेशी खाद्यपदार्थांमधे वापरल्या जाणा-या 'एक्झॉटिक' भाज्या व फळे पूर्वी आयात कराव्या लागत असत. आज संपूर्ण भारतातील शेतक-यांना, विशेषतः अल्पभूधारक शेतक-यांना या 'एक्झॉटिक' शेतीचं प्रशिक्षण देण्याचं व विक्रीची हमी देऊन या भाज्या-फळे त्यांच्याकडून पिकवून घेण्याचं काम चुरी यांची ‘निसर्ग निर्माण’ ही संस्था  करते. हा पिकवलेला भाजीपाला पंचतारांकित हॉटेलांमधे पुरविला जातो. आज या 'एक्झॉटिक' भाज्यांची आयात जवळपास बंद झालेली आहे. भारतातच नव्हे तर मालदीवसारख्या शेतीला प्रतिकूल वातावरण असणा-या देशातील शेतक-यांनाही त्यांची संस्था प्रशिक्षण देते. या कार्यासाठी अंजलीताईंना 'जिजामाता कृषी भूषण' हा अत्यंत मानाचा पुरस्कारही मिळाला आहे.
 
केवळ वैयक्तिक स्वार्थाच्या मागे न लागता, समाजासाठी अलौकिक कार्य करणा-या मंडळींना शोधून काढत सोशल टुरिझम व इव्हेंटच्या माध्यमातून काम करणारी 'अमृतयात्रा' (मुंबई) ही संस्था या कार्यक्रमाचे नियोजन करीत आहे.
 
वेगळ्या वाटेवरच्या प्रवासाचा 'आरंभ'
रविवार, दि. १३ जुलै २०१४, संध्याकाळी ७:३० वाजता
स्थळः भावे नाट्यमंदीर, सांगली
 
संपर्कः राहुल बिरनाळे (7620102030), मंदार शिंदे (9822401246)