कार्यक्रमास सांगली व परीसरातील प्रयोगशील शेतकरी, तसेच या विषयाबद्दल उत्सुकता असणारे नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर, उपस्थितांनी श्री. मकरंद व सौ. अंजली चुरी यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले. “सांगलीची जमिन व हवा अनेक प्रकारच्या पिकांसाठी अनुकूल असली तरी, एक्झॉटिक भाज्यांसारख्या उत्पादनांविषयी पुरेशी माहिती नसल्याने, तसेच मार्गदर्शनाच्या अभावामुळे सांगलीतील शेतकरी या क्षेत्रातील संधींपासून वंचित राहिले आहेत. ‘निसर्ग-निर्माण’सारखी संस्था मुंबईत संशोधन करुन मालदीवच्या शेतकर्यांना प्रशिक्षण द्यायला जाऊ शकते, तर सांगलीत का येऊ शकणार नाही, अशा विचारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,” असे आरंभ फाउंडेशनच्या मंदार शिंदे व राहुल बिरनाळे यांनी सांगितले. सोशल टुरिझम व सोशल इव्हेंट क्षेत्रात काम करणार्या मुंबईच्या ‘अमृतयात्रा’ या संस्थेने सदर कार्यक्रमाचे नियोजन केले. आरंभ फाउंडेशनतर्फे भावेश खिमानी, मृणाल वाकणकर, अभिजित भोसले, रितेश कदम, अश्विन जोग, सचिन घोंगडे, मनिष जुवेकर यांनी विशेष प्रयत्न केले.
Saturday, July 26, 2014
“शेती हा फायदेशीर व्यवसाय” - कृषि-व्यावसायिक श्री. मकरंद चुरी यांचे प्रतिपादन
कार्यक्रमास सांगली व परीसरातील प्रयोगशील शेतकरी, तसेच या विषयाबद्दल उत्सुकता असणारे नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर, उपस्थितांनी श्री. मकरंद व सौ. अंजली चुरी यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले. “सांगलीची जमिन व हवा अनेक प्रकारच्या पिकांसाठी अनुकूल असली तरी, एक्झॉटिक भाज्यांसारख्या उत्पादनांविषयी पुरेशी माहिती नसल्याने, तसेच मार्गदर्शनाच्या अभावामुळे सांगलीतील शेतकरी या क्षेत्रातील संधींपासून वंचित राहिले आहेत. ‘निसर्ग-निर्माण’सारखी संस्था मुंबईत संशोधन करुन मालदीवच्या शेतकर्यांना प्रशिक्षण द्यायला जाऊ शकते, तर सांगलीत का येऊ शकणार नाही, अशा विचारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,” असे आरंभ फाउंडेशनच्या मंदार शिंदे व राहुल बिरनाळे यांनी सांगितले. सोशल टुरिझम व सोशल इव्हेंट क्षेत्रात काम करणार्या मुंबईच्या ‘अमृतयात्रा’ या संस्थेने सदर कार्यक्रमाचे नियोजन केले. आरंभ फाउंडेशनतर्फे भावेश खिमानी, मृणाल वाकणकर, अभिजित भोसले, रितेश कदम, अश्विन जोग, सचिन घोंगडे, मनिष जुवेकर यांनी विशेष प्रयत्न केले.
“पूर्वजांकडून मिळालेला वारसा जतन करण्याची गरज” - प्रसिद्ध वास्तुरचनाकार चेतन रायकर
“आपल्या पूर्वजांप्रमाणे भव्यदिव्य आणि मजबूत वाडे, महाल, किल्ले आपण बांधू शकणार नसलो तर निदान त्यांनी आपल्याकडे सोपवलेला हा वारसा जतन तरी केलाच पाहिजे,” असे मत प्रसिद्ध वास्तुरचनाकार व पुरातन वास्तू संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञ श्री. चेतन रायकर यांनी व्यक्त केले. सांगलीतील आरंभ फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘वेगळ्या वाटेवरच्या प्रवासाचा आरंभ’ या कार्यक्रमात ते बोलत होते. “शंभर-दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी आजच्यासारखे प्रगत तंत्रज्ञान व साधने उपलब्ध नसताना बांधलेल्या भव्य आणि सुंदर वास्तू पाहून, आज आपण अशी निर्मिती का करु शकत नाही, असा प्रश्न पडतो. मग या पुरातन वास्तुंच्या मूळ रचनेला धक्का न लावता तिथे संवर्धन व पुनर्निर्माण करणे अधिकच आव्हानात्मक ठरते,” असे श्री. रायकर म्हणाले. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात उध्वस्त झालेल्या मुंबईच्या ताज हॉटेलची पुनर्बांधणी, पूर्वीचे व्ही.टी. व आताचे सी.एस.टी. या सव्वाशे वर्षे जुन्या वास्तुच्या काना-कोपर्यात आढळणारी सुबक कारागिरी, अडीचशे वर्षांपासून फक्त लोड-बेअरिंगवर उभा असणारा इंदोरचा राजवाडा, आणि सिमेंट-काँक्रीटशिवाय नव्याण्णव फूट उंच संगमरवरात बांधलेला हाजी अलीचा मनोरा, अशा अनेक अद्भुत वास्तुंचे दर्शन मल्टीमीडियाच्या माध्यमातून श्री. रायकरांनी सांगलीकरांना घडवले. उत्कृष्ट वास्तुनिर्मिती व काळाच्या पुढचा विचार करुन घडवल्या गेलेल्या इमारतींच्या संदर्भात श्री. रायकर यांनी सांगलीच्या श्री. गणपती मंदीराचा उल्लेख केला. अशा प्रकारच्या पुरातन वास्तू आपल्या आजूबाजूला असूनही आपल्याला त्यांचे महत्त्व लक्षात येत नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या वास्तुंचे जतन करण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. “मी ज्या वास्तुच्या संवर्धनाचे वा पुनर्निर्माणाचे काम हाती घेतो, ती वास्तु माझ्याशी बोलते; माझ्या दृष्टीने ती सजीव असते. अशावेळी ताजमहालच्या संगमरवरी भिंतीवर चाकूने ‘पप्पू लव्ह्ज पिंकी’ असे कोरण्याच्या वृत्तीचा भयंकर संताप येतो,” असेही ते म्हणाले. पुरातन वास्तु, किल्ले, मंदीरे यांच्या सौंदर्यास वा रचनेस धक्का पोहोचेल अशी कोणतीही कृती करु नका व इतरही कोणाला करु देऊ नका, असे आवाहन त्यांनी सांगलीकरांना केले. सांगलीतील आर्किटेक्ट, सिव्हील इंजिनियर, बांधकाम व्यावसायिक, तसेच या विषयात रस असणार्या नागरिकांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष छायाचित्रे व श्री. रायकरांचे अनुभव कथन यांचा लाभ घेतला. “पुरातन वास्तुंचे महत्त्व, त्यांच्या संवर्धनाची गरज, तसेच हेरिटेज कन्झर्व्हेशन या वेगळ्या क्षेत्रातील संधींची सांगलीकरांना ओळख व्हावी, या हेतुने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,” असे आरंभ फाउंडेशनच्या मंदार शिंदे व राहुल बिरनाळे यांनी सांगितले. सोशल टुरिझम व सोशल इव्हेंट क्षेत्रात काम करणार्या मुंबईच्या ‘अमृतयात्रा’ या संस्थेने सदर कार्यक्रमाचे नियोजन केले. आरंभ फाउंडेशनतर्फे भावेश खिमानी, मृणाल वाकणकर, अभिजित भोसले, रितेश कदम, अश्विन जोग, सचिन घोंगडे, मनिष जुवेकर यांनी विशेष प्रयत्न केले.
Saturday, July 12, 2014
'आरंभ'तर्फे उद्या व्याख्यान - दै. सकाळ
'आरंभ'तर्फे उद्या व्याख्यान
दै. सकाळ, १२ जुलै २०१४
आरंभ फाउंडेशनतर्फे रविवारी (ता.१३) पुरातन वास्तूंची देखभाल व एक्झॉटिक भाज्यांच्या उत्पादनासंदर्भात भावे नाट्यमंदिरात सायंकाळी ६.३० वाजता चेतन रायकर, मकरंद चुरी, अंजली चुरी यांचे व्याख्यान होणार आहे. संयोजक मंदार शिंदे, राहुल बिरनाळे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, "युवाशक्तीचा विधायक कार्यासाठी वापर करुन भागाचा विकास साधण्यासाठी आरंभ फाउंडेशनतर्फे प्रयत्न सुरु आहे. 'अमृतयात्रा' या संस्थेने कार्यक्रमाचे नियोजन केले आहे."

Tuesday, July 8, 2014
'पुरातन वास्तूंबाबत रविवारी व्याख्यान' - दै. पुढारी
Thursday, July 3, 2014
A Green Dream
Her father received seeds of foreign fruits from his friends. As a young girl, she watched her father experimenting with those seeds. Her father was not a scientist, just a small farmer who loved farming. She got into habit of reading rough notes of her father's almost failed experiments. Fifty years later, she has successfully built an innovative business of growing exotic vegetables in almost any soil and under almost any climatic condition. Farming is no more a hobby for her, it's her lifelong passion. Let's watch her sharing her experiences and ideas with farmers of Sangli. Let's hear Mrs. Anjali Churi and her husband, Mr. Makrand Churi talking on their favourite topic - Growing Exotic Vegetables. Who knows, it may become your favourite topic, too. Remember - Sunday, July 13, 2014 at 7:30pm. The place is Bhave Natyamandir, Sangli and entry is free to all. Come, let's become a part of this green dream...
Tuesday, July 1, 2014
हेरिटेज कन्झर्व्हेशन आणि एक्झॉटिक भाज्यांच्या उत्पादनाविषयी व्याख्यान
चाकोरीच्या वाटा सोडून वेगळा मार्ग निर्माण करणारी माणसं समाजापुढं आणणारा कार्यक्रम
वेगळ्या वाटेवरच्या प्रवासाचा 'आरंभ'
वक्तेः
१. श्री. चेतन रायकर (वास्तुनिर्माण व हेरिटेज कन्झर्व्हेशन)
२. श्री. मकरंद व सौ. अंजली चुरी (एक्झॉटिक भाज्यांचे उत्पादन व विक्री)
रविवार, १३ जुलै २०१४, संध्या. ७:३० वाजता
भावे नाट्यमंदीर, सांगली
संपर्कः
मंदार शिंदे ९८२२४०१२४६
राहुल बिरनाळे ७६२०१०२०३०
Fighting Terrorism... in his own way!
We all talk about terrorism and its threat to our nation. Is there a way for us to fight terrorism at our level? Yes, this man showed us how, without holding a gun, we can fight terrorism. When terrorists attacked Mumbai and severely damaged the beautiful structure of The Taj Hotel, this man rose to the occasion and said, "We will rebuild The Taj, as it was before. Let the terrorists know, for your every act of destruction, we have the guts of re-construction." The man behind successful restoration of The Taj, Mr. Chetan Raikar is coming to Sangli. You can't afford to miss this opportunity to watch him live at our own Bhave Natyamandir on Sunday, 13th of July 2014. Be there to witness his passion towards his profession and towards his nation... our nation!
Wednesday, June 25, 2014
वेगळ्या वाटेवरच्या प्रवासाचा 'आरंभ'
आरंभ
फाउंडेशन, सांगली आयोजित
वेगळ्या वाटेवरच्या
प्रवासाचा 'आरंभ'
चाकोरीच्या वाटा सोडून वेगळा
मार्ग निर्माण करणारी माणसं समाजापुढं आणणारा कार्यक्रम
वक्ते
-
१.
श्री. चेतन रायकर
व्यवसायाने सिव्हिल
इंजिनियर असलेल्या चेतन रायकर यांची कंपनी वास्तुनिर्माणासोबतच पुरातन वास्तुंची देखभाल
(हेरिटेज कन्झर्व्हेशन) या वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर
उद्ध्वस्त झालेले मुंबईतील ताज हॉटेल पुन्हा जसेच्या तसे साकारण्याची किमया रायकरांनी
करुन दाखवली आहे. शेकडो वर्षे नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांना तोंड देणा-या महाल,
राजवाडे, व पुरातन वास्तूंची पुनर्बांधणी व देखभाल करणे हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा
विषय आहे. स्वतः रायकर हे हेरिटेज कन्झर्व्हेशनचे गाढे अभ्यासक असून पुरातन वास्तुकलेची
वैशिष्ट्ये व त्यांच्या देखभालीची गरज यावर ते मल्टीमीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार
आहेत.
२.
श्री. मकरंद व सौ. अंजली चुरी
परदेशी खाद्यपदार्थांमधे
वापरल्या जाणा-या 'एक्झॉटिक' भाज्या व फळे पूर्वी आयात कराव्या लागत असत. आज संपूर्ण
भारतातील शेतक-यांना, विशेषतः अल्पभूधारक शेतक-यांना या 'एक्झॉटिक' शेतीचं प्रशिक्षण
देण्याचं व विक्रीची हमी देऊन या भाज्या-फळे त्यांच्याकडून पिकवून घेण्याचं काम चुरी
यांची ‘निसर्ग निर्माण’ ही संस्था करते. हा
पिकवलेला भाजीपाला पंचतारांकित हॉटेलांमधे पुरविला जातो. आज या 'एक्झॉटिक' भाज्यांची
आयात जवळपास बंद झालेली आहे. भारतातच नव्हे तर मालदीवसारख्या शेतीला प्रतिकूल वातावरण
असणा-या देशातील शेतक-यांनाही त्यांची संस्था प्रशिक्षण देते. या कार्यासाठी अंजलीताईंना
'जिजामाता कृषी भूषण' हा अत्यंत मानाचा पुरस्कारही मिळाला आहे.
केवळ वैयक्तिक स्वार्थाच्या
मागे न लागता, समाजासाठी अलौकिक कार्य करणा-या मंडळींना शोधून काढत सोशल टुरिझम व इव्हेंटच्या
माध्यमातून काम करणारी 'अमृतयात्रा' (मुंबई) ही संस्था या कार्यक्रमाचे नियोजन करीत
आहे.
वेगळ्या
वाटेवरच्या प्रवासाचा 'आरंभ'
रविवार,
दि. १३ जुलै २०१४, संध्याकाळी ७:३० वाजता
स्थळः
भावे नाट्यमंदीर, सांगली
संपर्कः राहुल
बिरनाळे (7620102030), मंदार शिंदे (9822401246)
Wednesday, May 28, 2014
Thursday, August 8, 2013
मिरजेत गणेशोत्सव होणार डॉल्बीशिवाय
पुढारी, सांगली | ८ ऑगस्ट २०१३
यावर्षी गणेशोत्सव डॉल्बी शिवाय साजरा करण्याचा निर्णय डॉल्बी मालकांच्या बैठकीत घेण्यात आला. शहर पोलिस ठाण्यात आज ही बैठक घेण्यात आली. डॉल्बी संघटनेचे अध्यक्ष आण्णा सव्वाशे यांनी मिरजेमधील डॉल्बी मालक गणेशोत्सवात डॉल्बी वाजवणार नाहीत. तसेच शहराबाहेरील कोणी डॉल्बी आणल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, असे सांगितले.
Thursday, June 27, 2013
सर्व शिक्षा अभियानातर्फे जाहीर आवाहन
Advertisement in newspaper for admissions under Right To Education Act in Sangli-Miraj-Kupwad Municipal Corporation (SMKC) schools.
सर्व शिक्षा अभियानातर्फे जाहीर आवाहन
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात कोठेही ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालक शिक्षणापासून वंचित असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ शिक्षण मंडळाच्या कार्यालयास लेखी अथवा ०२३३-२३७२५५० या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन सां. मि. कु. महानगरपालिकेचे आयुक्त संजय देगांवकर यांनी केले आहे.
Tuesday, April 30, 2013
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
* १००% पर्यावरण पूरक *
* कागदाच्या लगद्यापासून बनवलेली *
* प्लास्टर ऑफ पॅरीस नाही *
* कोणतीही रसायने नाहीत *
* नदीत अथवा घरी विसर्जन करण्यायोग्य *
* कागदाच्या लगद्यापासून बनवलेली *
* प्लास्टर ऑफ पॅरीस नाही *
* कोणतीही रसायने नाहीत *
* नदीत अथवा घरी विसर्जन करण्यायोग्य *
~: ९ इंच व १२ इंच आकारांत उपलब्ध :~
आपल्या मूर्तीची मागणी नोंदविण्यासाठी संपर्क कराः
* दिलीप नेर्लीकर ८०५५५६१४७३ * मंदार शिंदे ९८२२४०१२४६
(लुल्ला चॅरीटेबल ट्रस्ट, सांगली यांचा उपक्रम)
Eco Friendly Ganesh Idols
* 100% Environment Friendly *
* Made from Paper Pulp *
* No Plaster of Paris *
* No Chemicals *
* Can be immersed in River or at Home *
~: Available in 9" and 12" sizes :~
For Advance Booking, Please Contact:
* Dilip Nerlikar 8055561473 *Mandar Shinde 9822401246
(An Initiative By Lulla Charitable Trust, Sangli)
Thursday, January 31, 2013
Nehru Yuva Kendra Sangli - National Youth Corps Volunteers
If you are in the age group of 18 to 25 years and want to join social awareness activities in Sangli, do check this advertisement by Nehru Yuva Kendra Sangli, inviting applications for enrollment of National Youth Corps Volunteers for Sangli district.
Friday, October 12, 2012
रोजगार व स्वयंरोजगार यंत्रणा, महाराष्ट्र राज्य
नोकरीकरीता इच्छुक असलेल्या उमेदवारांना तसेच नोकरी देणार्या उद्योजकांना खालील विनामुल्य व पारदर्शक सेवा रोजगार व स्वयंरोजगार यंत्रणेमार्फत दिल्या जातात:
१. नोकरीकरीता नाव-नोंदणी.
२. नाव-नोंदणी केलेल्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, अनुभव व वैयक्तिक सर्व माहिती विचारात घेऊन त्यास योग्य शासकीय/खाजगी नोकरी मिळण्याकरीता सहाय्य.
३. नाव-नोंदणी केलेल्या उमेदवारांस प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा व त्याच्या कौशल्यात वाढ व्हावी याकरिता त्यास खाजगी तसेच निमशासकीय कंपनीत स्टायपेंडसह सहा महिन्याकरीता काम करण्याची संधी.
४. नाव-नोंदणी केलेल्या उमेदवारांना जास्तीत जास्त नोकरीच्या संधी प्राप्त होण्याकरीता यंत्रणेतील अधिकारी यांचा कार्यक्षेत्रातील उद्योजकांना संपर्क व त्यांची नोंदणी, तसेच तत्पर व पारदर्शक सेवा उपलब्ध होण्याच्यादृष्टीने पाठपुरावा.
५. उद्योजकांना तात्काळ व योग्य उमेदवार मिळण्याकरीता प्रत्यक्ष कार्यालयात 'स्पॉट रिक्रुटमेंट'ची सुविधा.
६. स्वयंरोजगारास इच्छुक असलेल्या उमेदवारांना स्वयंरोजगाराच्या विविध योजना, नवनवीन व्यवसायाच्या संधी व प्रशिक्षण कार्यक्रम.
७. नाव-नोंदणी केलेल्या उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगार, शैक्षणिक क्षेत्रात, तसेच स्पर्धा परिक्षेद्वारे करियर घडविण्याकरीता माहिती व मार्गदर्शन सुविधा.
जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या माध्यमातून वरील सुविधांचा लाभ सांगली परीसरातील उमेदवारांना व उद्योजकांना मिळावा, यासाठी 'आरंभ फाउंडेशन' काम करीत आहे. याबाबतच्या सूचना अथवा सहभागासाठी संपर्क कराः
राहुल बिरनाळे ७६२०१०२०३०
मंदार शिंदे ९८२२४०१२४६
Tuesday, October 9, 2012
विधायक उपक्रमांची आखणी
सांगलीतील गणेशोत्सवाबद्दल सकारात्मक भावना निर्माण व्हावी, तसंच उत्सवानिमित्त प्रकट होणारी सामूहिक ऊर्जा शहराच्या प्रगतीसाठी वापरता यावी, यासाठी 'आरंभ फाउंडेशन'नं विधायक गणेशोत्सवाचा उपक्रम हाती घेतला होता. यासाठी शहरातल्या काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून, शांततामय व पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबद्दल चर्चा करण्यात आली. 'आरंभ'च्या आवाहनाला प्रतिसाद देऊन काही मंडळांनी पुढच्या वर्षी तर काहींनी याच वर्षी बदलाची तयारी दाखवली. गणेशमूर्तीचा आकार कमी करणं, पीओपी ऐवजी शाडूची मूर्ती बसवणं, मिरवणूक रद्द करून उर्वरीत वर्गणीचा सदुपयोग करणं, मिरवणूक असेलच तर ती शांततामय पद्धतीनं काढणं, आपल्या भागातल्या नागरिकांसाठी उपयुक्त कार्यक्रमांचं आयोजन करणं, सामाजिक प्रश्नांबद्दल प्रबोधन करणं, अशा विविध प्रकारे मंडळांनी आपला सहभाग नोंदवला. याच सामूहिक उत्साहातून वर्षभर विधायक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. आता एकत्र बसून पुढच्या उपक्रमांची आखणी करायची आहे. आपल्या शहराच्या विकासासाठी काहीतरी करायची इच्छा असणार्यांनी जरूर सहभागी व्हावं.
Sunday, September 30, 2012
बदलाची तयारी
| सांगलीच्या ग्रीन एफएम (९०.४) वर 'आरंभ फाउंडेशन'चं आवाहन ऐकून, कोल्हापूर जिल्ह्यातूनही फोन आले. एका मंडळानं गणपतीची दहा फुटी मूर्ती बसवली होती. एवढ्या मोठ्या मूर्तीचं आणि निर्माल्याचं नदीतच विसर्जन करतात. मूर्तीच्या आकाराबद्दल आणि पीओपी न वापरण्याबद्दल चर्चा करताना मंडळाच्या कार्यकर्त्यानं सांगितलं, "गेल्या दोन-तीन वर्षांपासूनच उत्सवाचं नियोजन आमच्याकडं आलंय. त्याआधी सगळे निर्णय वडीलधारी मंडळी घ्यायची. पेपरमध्ये वाचून आम्हाला पण काहीतरी चांगले बदल करावंसं वाटू लागलंय. मागच्या दोन वर्षांपासून डॉल्बी पूर्ण बंद आहे. यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत दांडपट्ट्याचा खेळ ठेवला होता. आमचं गाव छोटं आहे. गावातल्याच भजनी मंडळाला बोलवून, एखाद्या सामाजिक विषयावर प्रवचन द्या असं सांगितलं. पीओपीच्या मूर्तीमुळं नुकसान होतं असं पेपरमध्ये वाचलं होतं, पण तुमच्याशी प्रत्यक्ष बोलल्यावर नक्की काय करायचं ते कळलं. गावातल्या जुन्या माणसांना समजावणं जरा अवघड आहे, पण गावकर्यांच्याच फायद्याची गोष्ट असेल तर आम्ही नक्की प्रयत्न करू. निर्माल्याचा तुमचा मुद्दा एकदम पटला. आता आपापल्या अंगणातल्या झाडांनाच निर्माल्य घालायला सांगतो सगळ्यांना. रेडीओवर तुमचं आवाहन ऐकलं.. नुकसान तर काय होणार नाही, झाला तर फायदाच होईल, असं वाटलं, म्हणून फोन लावला बघा." |
Friday, September 28, 2012
गणेशोत्सवाचं बदलतं रूप
सांगली गणेशोत्सव (विसर्जन): नवव्या दिवशी विसर्जनात ढोल पथकांचा जोर दिसला. एका-एका मंडळासमोर चार-चार पथकं होती. कालच्या विसर्जनाला मोठ्या मूर्तींची संख्या जास्त होती. एका मंडळाच्या मिरवणुकीत, ट्रॉलीमध्ये छोटी कडुनिंबाची वगैरे रोपं घेऊन कार्यकर्ते बसले होते. रस्त्यावरून जाताना सगळ्यांच्या हातात एक-एक रोप देऊन पुढं जात होते. ढोल आणि मोरयाच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. डॉल्बी बंदीबरोबरच सिनेमातली गाणी आणि त्यावरचे हिडीस नाच आपोआप बंद झालेत. शिवाय, यंदाच्या उत्सवात दिवसभर सगळ्या मंडळांनी मंडपाबाहेर शांतता राखणं पसंत केलं. रात्री आरती आणि देखाव्याच्या वेळीच काय ते स्पिकर लावले जात होते. कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीनं गणेशोत्सवाचं रूप बदलून दाखवायचं ठरवलंय जणू... मोरया!
Thursday, September 27, 2012
इको-फ्रेंडली गणेशमूर्ती
सांगली गणेशोत्सव: कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती बनवण्याचा प्रयोग यंदा काही ठिकाणी करण्यात आला. रद्दी कागदाचे बारीक तुकडे करून, शाडू माती आणि डिंक मिसळून, त्याचा लगदा तयार केला जातो. हा लगदा एकजीव झाला की फायबरच्या साच्यात भरला जातो. साधारणपणे एक पूर्ण दिवस साचा तसाच ठेवला जातो. त्यानंतर, मूर्ती सुकवून तिचं रंगकाम सुरू होतं. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे, बादलीभर पाण्यात ही मूर्ती विसर्जित करून ठेवली असता, बारा तासांमध्ये ती पूर्ण विरघळते. हे पाणी मग बागेतल्या झाडांना घालता येतं. अशा प्रकारची मूर्ती शाडूपेक्षा स्वस्त आणि जास्त इको-फ्रेंडली असली तरी ती तयार करण्यात काही अडचणी येतात:
- साचा वापरण्यातल्या मर्यादा: एका साच्यातून एका दिवसात एकच मूर्ती बनवता येते. त्यामुळं जास्तीत जास्त फायबरचे साचे तयार करून घेणं आवश्यक आहे.
- रंगकामासाठी कुशल कारागिरांची गरज: लगदा तयार करणं आणि साच्यात भरणं, या तशा सोप्या गोष्टी आहेत; पण गणपतीच्या मूर्तीचं रंगकाम हा एक अवघड प्रकार मानला जातो. त्यासाठी थोड्या कुशल कामगारांची गरज भासते. असे कारागिर फारसे मिळत नाहीत, आणि मिळाले तर जास्त मजुरी घेतात, ज्यामुळं मूर्तीची किंमत वाढते. यावर एक उपाय म्हणजे, पूर्ण मूर्ती एकाच रंगात रंगवणे. पण, गणपतीच्या मूर्तीची प्रतिमा लोकांच्या मनात अशी वसली आहे की, एकाच रंगातला गणपती, दागिने, शस्त्रं, पीतांबर, या गोष्टी एकाच रंगात पाहणं लोकांना सहज मान्य होणार नाही. दुसरा उपाय अर्थातच कुशल कारागिर शोधणं किंवा तयार करणं.
पुढच्या वर्षी जास्तीत जास्त लोकांनी इको-फ्रेंडली मूर्ती बसवाव्यात असं वाटत असेल तर, तशा मूर्ती बाजारात उपलब्ध करून देणंही आवश्यक आहे. यासाठी काम करायचं असेल तर आत्तापासूनच सुरुवात केली पाहिजे.
मंगलमूर्ती मोरया!

Wednesday, September 26, 2012
आशादायी गणेशोत्सव
सांगली गणेशोत्सव: यंदा डॉल्बी बंदीमुळं कित्येक मंडळांनी विसर्जन मिरवणुकाच रद्द केल्या आहेत. ज्या मंडळांच्या मिरवणुका आहेत, त्यांनी ढोल, झांज, बँजो, आणि रोषणाईवर भर दिलाय.
- एक मोठी कायमस्वरुपी मूर्ती आणि एक छोटी उत्सवमूर्ती अशी प्रथा काही मंडळांनी सुरु केली आहे. मोठी मूर्ती वर्षभर कुणाच्या तरी घरी किंवा मंदीरात ठेवली जाते. गणेश चतुर्थीला छोट्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या छोट्या मूर्तीचं विसर्जन करणं सोपं असतं. आता ही छोटी मूर्ती शाडूची किंवा कागदाच्या लगद्याची घेतली जावी, एवढंच बघायचं.
- विसर्जन घाटावर निर्माल्य गोळा करण्यासाठी महापालिकेनं जय्यत तयारी ठेवलीय. काल सातव्या दिवशीच्या विसर्जनासाठी, निर्माल्य कुंडाजवळ सतत महापालिकेचे कर्मचारी आणि स्वयंसेवक थांबून होते. विसर्जनासाठी आलेल्या प्रत्येकाला थांबवून निर्माल्य नदीत न टाकण्याची विनंती करत होते. शिवाय, निर्माल्य कुंडात टाकण्यापूर्वी प्लॅस्टीकच्या पिशव्या काढून घेण्याचंही काम सुरु होतं.
- मिरवणुकीवर होणारा खर्च टाळून मंडळांनी, कायमस्वरुपी मंदीराचं बांधकाम, मूर्तीला चांदीचे दागिने, काही हजार लोकांसाठी महाप्रसाद, अशा प्रकारचे उपक्रम सुरु केले आहेत. अजून विधायक आणि समाजोपयोगी उपक्रमांबद्दल मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणं गरजेचं आहे. जितक्या मंडळांशी आम्ही चर्चा केली, त्या सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता एकत्र बसून काही
उपक्रमांची आखणी करायची आहे.
गणपती बाप्पा मोरया!

Subscribe to:
Posts (Atom)